आमच्या विषयी

14

कृतिशील युवा नेता

अँड. विजयसिंह पिसाळ यांची आजवरची कामगिरी एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील आक्रमक राजकीय नेत्याची आहे. अगदी कमी वयात विजू भैयांनी यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. आजोबा स्व.माजी मंत्री मदनरावजी पिसाळ,वङील माजी कृषी सभापती शशिकांत दादा पिसाळ, मातोश्री सातारा जिल्हा परिषदेच्या माजी आदर्श अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत, तर ते टिकवण्याची शिकवणही आजोबांकडून मिळाली असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमीच आग्रही असणा-या विजू भैयां यांना भावि वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..!

किसी मक्सद के लिए खडे हो तो
एक पेड की तरह
गिरे भी तो बीज की तरह,
ताकि दुबारा उगकर
उसी मक्सद के लिए जंग कर सके ..

 
 

काहीशा अशाच मानसिकतेत ज्यांचे समाजाप्रति कार्य सुरू आहे, असे वाई-खंडाळा-महाबळेश्वर मतदारसंघाचे युवा नेते विजयसिंह पिसाळ.. आपली धडाकेबाज भाषणबाजी, कर्तव्यतत्परता, कृतिशील आक्रमकता, निर्णय होईपर्यंत समस्यांचा केला जाणारा पाठपुरावा, नागरी समस्यांचे निराकरण करताना त्यासाठी उपलब्ध करून दिलेले पर्याय, अशा सर्वच पातळीवर जिल्ह्यातील बहुतांश युवा नेतृत्वांमध्ये विजु भैय्या यांनी आपल्या मतदारसंघात केलेले कार्य वेगळे आणि दखलपात्र ठरावे. आपल्या मतदारसंघापुरतेच नाही, तर आपल्या परिवारात येणा-या प्रत्येकाप्रति एखाद्या वटवृक्षाप्रमाणे ते कार्यरत आणि वचनबद्ध आहेत.

विजयसिंह पिसाळ यांची आजवरची कामगिरी एका संवेदनशील आणि सामाजिक भान असणा-या कृतिशील राजकीय नेत्याची आहे, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. अगदी कमी वयात विजू भैय्यांनी आपले सामाजिक भान दाखवतानाच उद्याच्या नेतृत्वाची चुणूक दाखविली आहे. आजोबा स्व.माजी मंत्री मदनरावजी पिसाळ आप्पा यांच्या समृद्ध राजकारणाचा वारसा मिळाला असला तरी प्रतिकूल आणि अनुकूल परिस्थितीत स्वत:च्या ध्येयासाठी लढण्याची धमक आणि अस्तित्व राखण्यासाठी कष्ट करण्याची, कार्यकर्ते फक्त जोडायचेच नाहीत तर ते टिकवण्याची शिकवणही आजोबांकडूनच मिळाली असल्याचे दाखवून दिले आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद , ग्रामपंचायत आणि नगरपालीका निवडणूक असो विजू भैंय्यांचा त्यातील सहभाग आणि अहोरात्र कष्ट असो.. या प्रत्येक निर्णयाला यशाची एक झळाळी प्राप्त झाली आहे.

समाजमाध्यमांमध्ये विजू भैय्या सर्वात अधिक सक्रिय असणारे नेते आहेत.या यशामागे विजु भैय्यां यांनी आजोबांच्या पावलावर पाऊल टाकत केलेल्या अपार मेहनतीचा आणि एकसंध ठेवलेल्या कार्यकर्त्यांच्या फळीचा वाटा आहे. पिसाळ परिवाराने नेहमीच कार्यकर्त्यांना बळ दिले आहे. कार्यकर्त्यांमधील गुण अचूक हेरून त्यांना संधी देण्याचे काम पिसाळ परिवाराने नेहमीच केले. मराठा आरक्षणसाठीचा सातारा मोर्चा असो वा निवडणुका युवा मंच च्या माध्यमातून घेतलेले कार्यक्रम अशा विविध कार्यात विजु भैय्या यांनी परफेक्ट मॅनेजमेंटचा पाठ दाखवून दिला आहे. निवडणुकीतील राजकीय सारीपाटात अनेक आवयांना थोपवूनच बावधनकर पिसाळ आजवरच्या राजकारणात खणखणीत नाणे ठरले आहेत.

‘युवा मंच’च्या माध्यमातून निर्णायक आंदोलन छेडले. माझ्या मतदारसंघातील युवकांना पोलीस भरतीचे मार्गदर्शन मिळावे म्हणून युवा मंच च्या माध्यमातून घेतलेले स्पर्धा मार्गदर्शन शिबीर,Body building स्पर्धा , विद्यार्थी साठी आर्थिक मदत किंवा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एस टी बस सेवा पुरवण्यासाठी एस टी महामंडळाकडे सतत केलेला पाठपुरावा अशी अनेक कामे…….

बेरोजगार युवकांसाठी भैय्या लवकरच भव्य रोजगार मेळावा आयोजित करत आहेत..
माता-भगिनींच्या न्याय्य हक्कांसाठी, मराठा आरक्षणासाठी त्यांनी संपूर्ण तालुक्यात मराठा मोर्चाचे संयमी नेतृत्व केले. .

पाठीमागच्या काळात राष्ट्रवादी युवक कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष पदासाठी विजु भैय्या इच्छुक होते सर्व पाञता धारण केलेल्या य उच्चशिक्षित युवा नेत्याला जनमानसांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा ही होता परंतु त्या निवडीमध्ये त्यांना जाणिवपूर्वक डावलण्यात आले ,तालुक्यातीलच काही संकुचित स्वार्थी सुभेदार नेतृत्वानी स्वताची राजकीय पोळी भाजण्यासाठी हे आप्पांच्या विचायरांचा वारसा चिरडण्याचे काम केले असल्याची चर्चा तालुक्यात दबक्या आवाजात सुरू होती… पण दगमगतील विजू भैय्या कुठले ..त्यांनी कसलेही वाईट न मानता पुन्हा जोमाने आपले युवा मंच च्या माध्यमातून समाजकारणाचे काम आखंडित चालु ठेवले आहे….निंदकाचे घर असावे शेजारी आणि राजकारणात ज्याला विरोधक अधिक तोच खरा यशस्वी नेता असे मानले जाते ते उगाच नाही.

वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याच्या राजकीय घडामोडींवर एक नजर टाकली असता संपूर्ण मतदार संघात गत दोन वर्षापासून सातत्याने माजी माजी मंत्री स्व.मदनरावजी पिसाळ आप्पा, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अरुणादेवी पिसाळ,कृषी भूषण शशिदादा आणि स्वतः विजु भैय्या आणि समस्त एकीचे बळ असलेले बावधनकर भविष्यात २०१९ विधानसभेसाठी काय करणार, याशिवाय वेगळा विषय नाही. अत्यंत टोकाचा तरीही सावध विरोध करीत वारंवार पिसाळ आणि बावधनकरांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणा-या तालुक्यातील स्वार्थी संकुचित सुभेदाराला नामोहरम करुन भाजपच्या कोटय़ातून अरुणादेवी पिसाळ (वैणीसाहेब) यांना आमदारकी मिळाली तर, त्यांचे नेतृत्व, प्रशासकीय कामातील अनुभव फक्त राज्यापुरता मर्यादित नाही, तर ते राज्याच्या राजकीय पटलाला दिशा देणारा ठरेल, हेच जणू अधोरेखित करणारे ठरेल.
बावधनच्या पिसाळांचा आजवरचा वादळी प्रवास आणि आप्पांच्या तालमीत तयार झालेल्या शशिदादा आणि अरुणावैणी यांचा राजकीय झंझावात, अचूक निर्णय क्षमता आणि विजू भैय्यां च्या एका हाकेसरशी त्यांच्या पाठीशी जमा होणारे, जीवाला जीव देणारे कार्यकर्त्यांचे मोहोळ पाहता बावधनकर वाई-खंडाळा-महाबळेश्वर तालुक्याच्या नव्या राजकीय समीकरणातील मदनआप्पां नतंर पुन्हा आश्वासक चेहरा ठरतील, यात शंका नाही.

 

आम्ही यावर लक्ष केंद्रित करतो

शासन

छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य सुरू केल आणि महान शासनाचे उदाहरण मांडले म्हणून लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांचा आणि नैतिक तत्त्वांचा प्रचार करून, पथदर्शींनी दर्शविलेल्या मार्गावर चालत राहिल आणि पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यास
सतत तत्पर राहील. प्रभावी उपाययोजना करण्यासाठी मी कार्यकर्त्यांसह बरीच संमेलन घेऊन लोकांच्या समस्यांवर नेहमी लक्ष ठेवतो.

शिक्षण

माझी दृढ श्रद्धा आहे की गुणवत्ता शिक्षण बहुतेक सर्वच समस्यांचे निराकरण करू शकते. महात्मा फुले आणि राजश्री शाहू महाराजांच्या समृद्ध विचारांना अनुसरून मी प्रत्येकासाठी दर्जेदार शिक्षण देऊ इच्छितो. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी जिल्हा
परिषदेच्या शाळांमध्ये ई-लर्निंगसारख्या अग्रमी सुविधा उपलब्ध करुन देणे, आययूसीएएच्या संस्थांच्या सहकार्याने हेच मुख्य उद्दीष्ट आहे. हे वैज्ञानिक विचार आणि शिक्षणासाठीचे प्रेम वाढवण्याची माझ्या पुढाकाराप्रमाणेच असेल. विद्यार्थी शिक्षणाच्या क्षेत्रात
असमानतेच्या सर्व मुळांचा नाश करण्याचा माझा उद्देश असेल.

महिला आणि बाल सशक्तीकरण

आजच्या महिला जिजामाताच्या, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांच्या मार्गावर चालतात माझ्या मते अशा महिला खरोखर प्रेरणादायी आहेत. एका मुलीचा वडील व सामाजिक कार्यकर्त्या आईचा पुत्र असल्यामुळे मला महिलांच्या यशाची प्रशंसा करणे
आणि तरुण मुलींच्या स्वप्नांचे पालन करणे ही माझी जबाबदारी आहे. चांगली स्वच्छता आणि आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी, मी कमी खर्चात स्वच्छताविषयक नॅपकिन्स उपलब्ध करुन देण्यासाठी अंगणवाडी सेविकासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि मार्गदर्शन
पुरवितो. स्त्रियांना सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदान देण्यासाठी प्रोत्साहित करून ‘बचत गट’ योजनांमधून आर्थिकदृष्ट्या आत्मविश्वास आणि शक्ती निर्माण करून, सर्वोत्तम शिक्षण प्रदान करण्यामध्ये पुढाकार घेऊन आम्ही महिलांच्या विकासासाठी
आधीच कार्यरत आहोत.

आरोग्य

मी वाजवी दरांवर आरोग्य उपाययोजना आणि सुविधा प्रदान करण्यास तत्पर आहे. आरोग्य मजबूत करण्यासाठी, माझ्या प्रांतामध्ये आरोग्य केंद्रेंद्वारे चांगल्या आरोग्य सुविधा प्रदान करण्याच्या जबाबदारीची मी समाधानकारकपणे पूर्ण केली आहे. कुशल
डॉक्टरांसह सुसज्ज आरोग्य केंद्राकडे आणि मी प्रत्येकास सुरक्षित पिण्याचे पाणी देण्यासाठी प्रयत्न करीत आहे. बारामती भागातील सुमारे 21000 लोकांना आम्ही यशस्वीरित्या विनामूल्य आरोग्य सेवा प्रदान केली आहे, हे सांगताना अभिमान वाटतो, ज्याचे अनेक
संस्था आणि सामाजिक गटांनी कौतुक केले आणि त्याचे कौतुक केले.

तरुण

युवा ही देशाची शक्ती आहे आणि कुशल तरुण आगामी पिढीसाठी एक आश्वासक चित्र देऊ शकतात. माझी इच्छा आहे की युवकांना प्लॅटफॉर्म आणि चांगली संधी उपलब्ध करुन देणारी कौशल्य आणि कला यांना न्याय मिळेल. जरी शहरी किंवा ग्रामीण असेल,
ती जागा क्रीडा आणि कबड्डीसारख्या खेळांना प्रोत्साहित करून, रोजगार निर्मितीसाठी आणि औद्योगिक प्रशिक्षण आणि कौशल्य विकास योजनांच्या आमच्या उद्दीष्टित उद्दीष्टाद्वारे योग्य कौशल्य वाढवण्याद्वारे खेळांमध्ये संधी निर्माण करण्याचा उद्देश आहे.
तरुण अशा संधींचा लाभ घेऊ शकतात आणि अशा कुशल युवक राष्ट्राचे चांगले चित्र बदल्याण्याचे वचन देतात.

अपंग लोक आणि ज्येष्ठ नागरिक

माझे प्रयत्न नेहमीच शारीरिकरित्या आव्हानग्रस्त लोक आणि ज्येष्ठ नागरिकांना अधिकार आणि आवश्यक सेवा देण्याच्या दिशेने असतील. माझ्या अनुभवातून जर आम्ही आवश्यक मदत पुरविली आणि त्यांना त्यांचे शारीरिकरित्या आव्हान दिले तर लोक तितके
प्रभावीपणे काम करू शकतील, म्हणून आवश्यक प्रमाणपत्रे पुरविण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे जेणेकरुन त्यांना पात्र असलेल्या सेवांमध्ये प्रवेश मिळेल. स्थानिक पातळीवर प्रमाणपत्रे त्याचप्रमाणे, मी ज्येष्ठ नागरिकांना चांगल्या सेवा देण्यासाठी
आवश्यक कारवाई करीत आहे.